तुटलेलं स्वप्न तुटलेलं स्वप्न आजही उरात घेऊन जगते आहे रोज माझ्या स्वप्नांची राख होताना बघते आहे !! रोज माझ्या स्वप्नांचे छाटले जातात पंख माझ्याच इच्छेला इथे मारला जातोय डंख !! कर्तव्यासाठी आजवर वात होऊन जळते आहे भावनांची किंमत माझ्या कुठे कोणा कळते आहे !! काळजात खोल अजून जखमा आहेत ओल्या घर स्वप्नांच मोडत गेलं अन वेदना हजार झाल्या !! माझ्याच कित्येक स्वप्नांची येथे होत गेली होळी सगळ्यांसाठी जगताना रिकामी राहिली माझी झोळी !! #माझी लेखणी #मराठीलेखणी #मराठीकविता #मराठीविचार