Nojoto: Largest Storytelling Platform

#माउली.. भुतळी अवतरले ते जणु अवतारपूरूष चार कैवल्य

#माउली..
भुतळी अवतरले ते जणु अवतारपूरूष चार कैवल्याचे जिवंत पुतळे
फुलले त्यांच्या सानीध्याने अनेकांच्या जीवनधाग्यांचे मळे
निमीत्त मात्र ठरली ती कृपा महान त्या गहिनीनाथांची
मूर्त रुपाला आली मग साधना ती पूर्व संचीतांची
अद्भुत असे जीवन त्यांचे अन् अलौकिक त्यांचे कार्य
ज्यांनी ज्यांनी छळले त्यांना त्यांनाच ऊद्धरुन
मग दाखवले ते सत्वमय स्व-औदार्य 
बाराशे वर्ष साधना झाली पण नाही मिळाली जयास मुक्ती
अशा जिवाच्या झाल्या त्या विद्यावैभवलतिका मुक्ताबाई गुरुमूर्ती
तो भक्तांचा जनार्दनही होता खऱ्या भक्तीचा भुकेला 
मुकला होता काही काळ जणु वेदविद्येला,भक्तीच्या जागराला
अन् अमृतमय आत्मसुखाच्या त्या अनुभवाला 
म्हणूनच देवाधीदेव श्रीविष्णूंना घातले त्या सरस्वतीने हे साकडे
उघडावी तुम्ही देवाजी ज्ञानाची ताटी अन् अमृताची कवाडे 
एका वाक्यात हिच माऊली माझी मुक्ताई सांगुन गेली
अनंताचे ज्ञान अन् ब्रम्ह मायेचा हा पसारा
म्हणाली विश्वपट असे हा ब्रम्हदोरा ताटी उघडा तुम्ही देवा ज्ञानेश्वरा
मग आपसुक श्रीगुरूग्रथंराज ज्ञानेश्वरी अमृतानुभव 
ज्ञानाचे भांडार मुक्त झाले
घेणाऱ्यांनी बरेच घेतले तरीही ते कधी ना रिक्त झाले
मुक्तीचा झाला त्यांच्या आगळा वेगळा सोहळा
साक्षात विठ्ठलही आले होते मग पाहुनीया हा सुखसोहळा
आले आपसुकपणे दाटुनीया मग त्यांच्याही गळा
माझे विश्वाचे जनक ज्ञानराज श्री माऊली विसावले इंद्रायणीतीरी
निजध्यानी राहुनीया ब्रम्हाकार झाले सोपानदेव त्या कर्हेच्या तीरी 
निवृत्तीनाथही मग अंतर्धान पावले पावन त्या गोदातीरी
अन् मुक्ताईही मुक्त झाल्या त्या असीम अशा तापी तिरी
निवृत्ती-ज्ञाना-सोपान-मुक्ताई या चार मुर्त्यांनी भक्तास
विठोबाचरणाचा मार्ग दाविला अन् संप्रदाय हा
अनोखा वारकऱ्याचा जणु
धारकऱ्यासम स्थापीयेला
निवृत्तीनाथ झाला या विठ्ठलभक्तीमय
ज्ञानमंदिराचा पाया अन्
माझा जगद्गुरू श्री तुकोबाराया या
मंदिराचा कळस शोभला
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #माझी_माऊली