आठवणींचे गाव जसे मोठे झालो दूर आम्ही गेलो गाव पाठी राहिले आम्ही पुढे निघालो छोटेसे कौलारू घर त्याला बांबूचे दार नेहमी सणासुदीला, सडा-रांगोळी दारोदार बहरली फुलझाडे दारी सजली तुळस प्रात:भक्तीचा प्रहर पाहता मंदिराचा कळस गाव आठवणींचे गाठोडे घट्ट पाठीवर घेतलेले व्याकुळ परतीच्या ओढीने क्षण अंतरी गुंतलेले... © प्रयाग पवार आठवणींचे गाव....