Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणींचे गाव जसे मोठे झालो दूर आम्ही गेलो गाव पाठ

आठवणींचे गाव

जसे मोठे झालो
दूर आम्ही गेलो
गाव पाठी राहिले
आम्ही पुढे निघालो

छोटेसे कौलारू घर
त्याला बांबूचे दार
नेहमी सणासुदीला,
सडा-रांगोळी दारोदार

बहरली फुलझाडे 
दारी सजली तुळस
प्रात:भक्तीचा प्रहर
पाहता मंदिराचा कळस

गाव आठवणींचे गाठोडे
घट्ट पाठीवर घेतलेले
व्याकुळ परतीच्या ओढीने
क्षण अंतरी गुंतलेले...
                   © प्रयाग पवार आठवणींचे गाव....
आठवणींचे गाव

जसे मोठे झालो
दूर आम्ही गेलो
गाव पाठी राहिले
आम्ही पुढे निघालो

छोटेसे कौलारू घर
त्याला बांबूचे दार
नेहमी सणासुदीला,
सडा-रांगोळी दारोदार

बहरली फुलझाडे 
दारी सजली तुळस
प्रात:भक्तीचा प्रहर
पाहता मंदिराचा कळस

गाव आठवणींचे गाठोडे
घट्ट पाठीवर घेतलेले
व्याकुळ परतीच्या ओढीने
क्षण अंतरी गुंतलेले...
                   © प्रयाग पवार आठवणींचे गाव....
prayagpawar4268

prayag pawar

New Creator

आठवणींचे गाव.... #poem