Nojoto: Largest Storytelling Platform

*भावार्थ काय शोधू आयुष्य वेचताना भाग्य इतुके लाभले

*भावार्थ काय शोधू आयुष्य वेचताना भाग्य इतुके लाभले मज भाव कोवळे जपताना* ...

 *लवलेश ना लयाचा आरंभ अंत पार* 
 *हसऱ्यां फुलांसवे मी नितं स्वच्छंदी रमताना* ...

 *उकलली मनाच्या खोल तळाशी* *खूणगाठ बांधलेली* 
 *शहाण्यांच्या जगात वेडा मी एक हासताना* ...

 *सांज होता उडून गेले पंख पसरूनी* *क्षण निसटले* 
 *कशास गुंता उगा सोडवू शांत स्तब्ध मी खग बघताना* ...

 *जीवनरस हा नितं प्रवाहित खंड त्याला कदा नसे* 
 *सुखदुःखाचे गरळ पचवूनी प्रवाही स्वैर तो वाहताना...*

©Shankar Kamble #आयुष्य #जीवन #जीवनअनुभव #जगणे_येथे_महाग_झाले #जीवनगाणे #जीव #आयुष्य_जगताना 
#Drown