मला कायमचं गमवायचंय? बघ तुला जमेल काय? माझ्याशिवाय आयुष्य? बघ तुला करमेल काय? हृदय माझं शरीर दुसऱ्याचं बघ मन भरेल काय? विचार माझा कायम डोक्यात डोकं काम करेल काय? स्वप्न माझे सत्यात दुसरंच झोप तुला लागेल काय? माझ्याशिवाय आयुष्य.. बघ तुझं भागेल काय? अख्ख आयुष्य पडलंय पुढे आठवणीत जगणं जमेल काय? गमावशील मला जर कायमचं माझं अस्तित्व कुठेतरी उरेल काय? ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) कविता मराठी प्रेम मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे