Nojoto: Largest Storytelling Platform

#नामविस्तार दिन लढे ,चळवळी चाळताना हे विद्यापीठ

#नामविस्तार दिन

लढे ,चळवळी चाळताना 
हे विद्यापीठ नेहमीच आठवेल
बलिदान अन् त्यागाचे बीजे
नवी पिढी मनात साठवेल.

जातीयवाद्यांना नडण्या 
आया-बहिणी ही भिडल्या
सतरा वर्षे संघर्षाच्या 
सतत ठिगण्या पडल्या 

नामांतर काल-आज 
अन् उद्याही होतील
पण त्या "नामविस्ताराच्या" 
लढ्यापुढे फिके राहतील

अस्मिता जागवणारे पँथर 
प्रेरणादायी ठरतील मनात
'पोचीरामाच्या' देहाचे तुकडे 
क्रांती पेरतील नव्या रणात..

'दलित पँथरचे' बलिदान  
इतिहासात सोनेरी झालं 
'गौतमदादाचे' आत्मदहन 
लाखो ह्रदयावर कोरल्या गेलं


मराठवाडा विद्यापीठ ही 
त्या नावाच्या स्पर्शाने फुललं
जेव्हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव
विद्यापीठाच्या कमाणीवर पाहीलं..

सरकटे मिलिंद मुरलीधर
9307240658

©milind sarkate #marathawada namvistar din # 14 jane.#dr.babasaheb ambedkar marathawada university
#नामविस्तार दिन

लढे ,चळवळी चाळताना 
हे विद्यापीठ नेहमीच आठवेल
बलिदान अन् त्यागाचे बीजे
नवी पिढी मनात साठवेल.

जातीयवाद्यांना नडण्या 
आया-बहिणी ही भिडल्या
सतरा वर्षे संघर्षाच्या 
सतत ठिगण्या पडल्या 

नामांतर काल-आज 
अन् उद्याही होतील
पण त्या "नामविस्ताराच्या" 
लढ्यापुढे फिके राहतील

अस्मिता जागवणारे पँथर 
प्रेरणादायी ठरतील मनात
'पोचीरामाच्या' देहाचे तुकडे 
क्रांती पेरतील नव्या रणात..

'दलित पँथरचे' बलिदान  
इतिहासात सोनेरी झालं 
'गौतमदादाचे' आत्मदहन 
लाखो ह्रदयावर कोरल्या गेलं


मराठवाडा विद्यापीठ ही 
त्या नावाच्या स्पर्शाने फुललं
जेव्हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव
विद्यापीठाच्या कमाणीवर पाहीलं..

सरकटे मिलिंद मुरलीधर
9307240658

©milind sarkate #marathawada namvistar din # 14 jane.#dr.babasaheb ambedkar marathawada university