Nojoto: Largest Storytelling Platform

तू सांगितलंस तिथेच थांबलो ना, तू सांगशील तिथे वळे

तू सांगितलंस तिथेच थांबलो ना, 
तू सांगशील तिथे वळेल मी.

चाळून बघ पुन्हा जुनी पुस्तके, 
तुला नेमका कळेल मी.

मान्य आधी कळलो होतो 
नंतर कळलो नाही.

मी हि होतो ओला लाकूड, 
बघ पुरा जळलो नाही. 

अर्ध्या जळल्या राखेला, 
तू हातात घेऊन बघ. 

दुसऱ्या दिवशी त्या मेहंदीला, 
काय रंग चढेल मग. 

शोधू नकोसं त्यात नाव माझं, 
आता मेहंदीत कसा दिसेल मी.

डोळे घट्ट मीटून स्मरशील जेव्हा, 
तुझ्या गाली अलगद पडेल मी. 

#सत्यम Shree #gazalofshree #mehfilekavish
तू सांगितलंस तिथेच थांबलो ना, 
तू सांगशील तिथे वळेल मी.

चाळून बघ पुन्हा जुनी पुस्तके, 
तुला नेमका कळेल मी.

मान्य आधी कळलो होतो 
नंतर कळलो नाही.

मी हि होतो ओला लाकूड, 
बघ पुरा जळलो नाही. 

अर्ध्या जळल्या राखेला, 
तू हातात घेऊन बघ. 

दुसऱ्या दिवशी त्या मेहंदीला, 
काय रंग चढेल मग. 

शोधू नकोसं त्यात नाव माझं, 
आता मेहंदीत कसा दिसेल मी.

डोळे घट्ट मीटून स्मरशील जेव्हा, 
तुझ्या गाली अलगद पडेल मी. 

#सत्यम Shree #gazalofshree #mehfilekavish