Nojoto: Largest Storytelling Platform

इतिहास माझ्या शिवबाचा माय मराठी| कपाळी गंध देखील म

इतिहास माझ्या शिवबाचा माय मराठी|
कपाळी गंध देखील माय मराठी ||
माझ्या रक्तात संचारते माय मराठी |
हाती घेते लेखणी माय मराठी||

अवघे पंढरी गजबजतात मराठी अभंग |
मराठी तालावर सारे होतात दंग |
लावते लळा माय मराठीचा ताल |
मयूर नृत्य करीत टाके पाऊल ||

आमचे आदर्श राजे शिवबा मराठी |
राजमाता जिजाऊचे संस्कार दिले मराठीबाणा ||
गड , किल्ल्यामध्ये ही एकच नाद  मराठी |
मराठी शिवगर्जनेचा कणखर मराठीबाणा ||

माय मराठी माझी ,माय भाषा लेकराची |
मराठी अंगाईचा कानी गोडवा सजतो |
जसे बहरती फुले व सरीता |
माय मराठी माझी दिव्य भाषा||

माय मराठी  मिळाली मजला |
जगी जन्माचे सार्थक झाले |
आम्ही मराठी साहित्य व संस्कृती जपू |
 मराठी अस्मितेचा अभिमान गाजवू ||
-✍️ काव्यशितल ✍️— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके.
ही क्षमता आहे मराठी भाषेची.
चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.
इतिहास माझ्या शिवबाचा माय मराठी|
कपाळी गंध देखील माय मराठी ||
माझ्या रक्तात संचारते माय मराठी |
हाती घेते लेखणी माय मराठी||

अवघे पंढरी गजबजतात मराठी अभंग |
मराठी तालावर सारे होतात दंग |
लावते लळा माय मराठीचा ताल |
मयूर नृत्य करीत टाके पाऊल ||

आमचे आदर्श राजे शिवबा मराठी |
राजमाता जिजाऊचे संस्कार दिले मराठीबाणा ||
गड , किल्ल्यामध्ये ही एकच नाद  मराठी |
मराठी शिवगर्जनेचा कणखर मराठीबाणा ||

माय मराठी माझी ,माय भाषा लेकराची |
मराठी अंगाईचा कानी गोडवा सजतो |
जसे बहरती फुले व सरीता |
माय मराठी माझी दिव्य भाषा||

माय मराठी  मिळाली मजला |
जगी जन्माचे सार्थक झाले |
आम्ही मराठी साहित्य व संस्कृती जपू |
 मराठी अस्मितेचा अभिमान गाजवू ||
-✍️ काव्यशितल ✍️— % & लेखकानों💕
शुभ प्रभात
सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो.
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके.
ही क्षमता आहे मराठी भाषेची.
चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.