Nojoto: Largest Storytelling Platform

माझं राजं असाया पाहिजे होतं न्हवं माझ्या राजांचं श

माझं राजं असाया पाहिजे होतं
न्हवं माझ्या राजांचं शासन असाया पाहिजे होतं
इथं, व्हयं इथंच स्वराज्य नांदलं होतं
"परस्त्री मातेसमान जाण", हेबी शिकिवलं होतं
तिथं हे पाहाया माझं राजं.....😔

इथं रोज आयाबायांवर हात टाकला जातोय
न खुललेल्या कळ्या चुरडल्या जातायंत
हव्यासाचा मोह कुत्र्यागत लचकं तोडतोय
आणि आम्ही फकस्त न्यायासाठी मेणबत्ती,
 २ दिसाचा आक्रोश दुखवट्यासारखा, आण मनातच रडतोय
हे डोळं पुसणारं हात नंतर, आधी त्या नराधम,
 भक्षकांचं हात कलम कराया समशेरीचं पातं
माझं राजं...  माझ्या राजांचं शासन असाया पाहिजे होतं

इथं रोज जनतेची पिळवणूक करणारी, मोकाट लांडगी
लबाडीचावं डाव, स्वार्थापायी सैराट टोणगी
भोळी प्रजा, बळी पडते राजं तुमच्याविना एकाकी
शासक भक्षकच, माणसांचं लचकं राहिलेत तोडायचं बाकी
अश्या पाषाणहृदयी माणूसघाण्यांचा केला असता कडेलोटं
माझं राजं...  माझ्या राजांचं शासन असाया पाहिजे होतं #Nojoto #nojotopoetry #chatrapatishasan #ChatrapatiShivajiMaharaj #rayofhope #justiceforgirls #Stoprape #stopchildabuse  #Pain 
What we need is the ideal #just governing laws, humanitarian ideology of Shri Chatrapati Shivaji Maharaj

kiransuryawanshi5940

rayansh

New Creator

# #nojotopoetry #chatrapatishasan #ChatrapatiShivajiMaharaj #rayofhope #justiceforgirls #Stoprape #stopchildabuse #Pain What we need is the ideal #just governing laws, humanitarian ideology of Shri Chatrapati Shivaji Maharaj