Nojoto: Largest Storytelling Platform

नवा प्रवास... या भल्या मोठ्या गर्दीच्या नगरीत कुण

नवा प्रवास...

या भल्या मोठ्या गर्दीच्या नगरीत कुणी 
स्वगावा कडचं आपलं भेटलं होतं. 
भेट ठरली असेल तर ती निश्चितच होते.

[ Read full story in caption  ] नवा प्रवास...

आज अचानक बऱ्याच दिवसांनी त्यांची नकळत भेट झाली होती. दोघांचीही मैत्री खूप जुनी होती परंतु काही काळापासून भेट झालेली नव्हती. नको असलेलं लग्न मोडून काही वर्षांपूर्वी ती घर सोडून निघून आली होती. विशेष असं काही नव्हतं, तिच्या मनाला ते नातं पटलं नव्हतं, स्वतःच्या विचारांना मोकळं कराचं होतं, स्वतःला हवं तसं आयुष जगायचं होतं.
या भल्या मोठ्या गर्दीच्या नगरीत कुणी स्वगावा कडचं आपलं भेटलं होतं. भेट ठरली असेल तर ती निश्चितच होते.
तिला बघुन आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. बोलता - बोलता ते दोघेही समुद्राकाठी आले. वाळू मध्ये दोघेही पाय रुतवून बसले.
ती आता पर्यंतचा तिच्या आयुष्याचा प्रवास सांगत होती आणि तो ऐकत होता. तिच्या शब्द न शब्द तो चित्र स्वरूप त्याच्या समोर दिसत होते.
तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान दिसत होते.
सूर्य मावळतीला आला होता. ती उठली आणि समुद्राकडे वळली, येणाऱ्या लाटां पर्यंत जाऊन ती थांबली. लाटां सोबत येणारा वारा तिला स्पर्श करून जात होता. मावळणाऱ्या सूर्याकडे बघत ती जणू संपूर्ण समुद्र कवेत घेत होती. तसं कॅमेरा त्याच्या बॅग मध्ये नेहमीच असायचा, आजही होता लगेच त्याने तो काढला आणि तिचे ते चित्र टिपले, तो क्षण त्याने त्याच्या कॅमेरात कैद केला.