गुंज पावसाची गुंज पावसाची नी गारवा हवेचा मन असे बोलके करून गेली तहानलेल्या भुईशी संवाद सादूनी मातीला दरवळ देऊन गेली बरसे सरी तृण होई ओलेचिंब हर्षा ने मान डोलती तरू ची किलबिल फूदकती ती पाखरे नी नाचती मोर फुलवून पिसारा रिप रिप सारखी वाटे अनोळखी अबोल खट्याळ वाऱ्याशी खेळती थेंबे थेंबे पानावरती बागडूनी गुंज पावसाची सहवास देऊन गेली पाहुनी अवघे हे विशाल आकाश न काही भीती तिच्या मनाशी स्वच्छंद झेप घेई ती वसुंधरेच्या पोटी हरवूनी स्व: फुलवी जीवन या माती ©JAYMALA BHARKADE गुंज पावसाची #jaymala's poetry ✨❤️✨