Nojoto: Largest Storytelling Platform

दुःख... तुझं त्याचं माझं, सार्‍यांच दुःख सारखं आह

दुःख...

तुझं त्याचं माझं, सार्‍यांच दुःख सारखं आहे..
इथं प्रत्येक बाळ, आनंदाला पारखं आहे...

कुणाकडे पैसा आहे, कुणाकडे पैसा नाही..
कुणाला मार्ग सापडत नाही, कुणासाठी मोकळ्या दिशा दाही....

कुणाला प्रेम न मिळाल्याचं, कुणाला मिळालं तरी दुःख आहे..
कुणाला काहीच न मिळाल्याचं,कुणाला काहीतरी हुकल्याचं दुःख आहे

प्रत्येकाचं कारण वेगळं, पण दुःख; हाच दुवा आहे..
प्रत्येकाला धडावर , एक हसरा चेहरा हवा आहे...

दुःख जर एक प्रश्न आहे, त्याला काही उत्तर ही असेल..
जो जो प्राणपणाने शोधेल, त्याला रहस्य गवसेल...

ना घर सोडून उत्तर मिळेल, ना संन्यास मदतीस येईल..
उत्तर मिळेल जेव्हा, मोकाट मनोरथाचा; श्रीकृष्ण सारथी होईल...

Vishal/Aadinaath 
28-06-21

.

©Vishal Chavan #Sorrow #Grief #Pain #दुःख #दुख