Nojoto: Largest Storytelling Platform

बघ ना एकदा विचार करून तुला माझं लग्न तुझ्या डोळ्य

बघ ना एकदा विचार करून 
तुला माझं लग्न तुझ्या डोळ्यांनी बघता येईल काय?
मी असेल मंडपात दुसरी कुणासोबत उभा 
तुला तेव्हा तरी तुझ्या मनातलं कुणाला सांगता येईल काय...

निघून गेलेली असेल वेळ तेव्हा 
मला बघून खळखळून हसता येईल काय?
असशील विचार करत की त्याचं होता आलं असतं 
तेव्हा तरी तुला जगासमोर बोलता येईल काय?

बसशील ओल्या डोळ्यांनी कोपऱ्यात कुठेतरी 
माझ्या बाजूला उभ्या मुलीला बघता येईल काय?
रडशील काय एक एक आठवण काढून 5 वर्षाच्या 
स्वतःला तरी तेव्हा तुला थांबवता येईल काय?

जिथे विचार ही करणं होत नाही आम्हाला 
तिथे तुला माझं लग्न बघता येईल काय?
करशील काय प्रयत्न शेवटपर्यंत अर्धांगिनी म्हणून बसण्याचा 
नाहीतर आयुष्यभर आठवणीत तुला जगता येईल काय?

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  कविता मराठी प्रेम खर प्रेम लव्ह स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी