White मुकाट्याने सहन करण्यापेक्षा बोलून मोकळे व्हा स्वतःच्या हक्कासाठी लढायला सदैव तयार व्हा कोपऱ्यात बसून रडण्यापेक्षा कायमचे एकाचे व्हा बोलण्याआधीच भिण्यापेक्षा समर्थ्याने पुढे व्हा नकारात्मक विचार नको एकदा सकारात्मक व्हा चिंतेने रोज मरण्यापेक्षा मोकळं बोलून मुक्त व्हा सगळं काही शक्य आहे हवं तिथे हवं तेव्हा व्यक्त व्हा मृत्यू हेच अंतिम सत्य आहे रोज मरण्यापेक्षा एकदा जिवंत व्हा कायम मनात कोंबून ठेवण्यापेक्षा एकदा काय ते स्वतंत्र व्हा रोज रोज भीती ठेवण्यापेक्षा एकदा खरं ते बोलून होऊन व्यक्त व्हा... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #sad_shayari शुभ सकाळ मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस मन उनाड झालया