Nojoto: Largest Storytelling Platform

भाकरीचं मनोगत.. मातीत दाणे उपजून काळ भूकेचा आला,

भाकरीचं मनोगत..

मातीत दाणे उपजून
काळ भूकेचा आला,
अन् टीचभर पोटापाई
जन्म माझा झाला..

श्रीमंत असो वा गरीब
भाकरीवाचून पारखा आहे,
जगातल्या प्रत्येक घरात
आकार माझा सारखा आहे..

मातीशी इमान राखून
मी दुष्काळही भागवलाय,
कधी अर्धी-चतकोर होऊन
इथं माणूस जगवलाय..

घामाच्या प्रत्येक थेंबाला
सुखाचा वास येतो..,
इथं प्रत्येक राबणारा 
भाकरीचा घास घेतो...

जेंव्हा रस्त्यावरचा भिकारी
मला पोटभरून खातो,
माझ्या भाकरीच्या जन्माचा
तेंव्हा ऊर भरून येतो...

आजच्या चमचमीत पदार्थांनी
माझा जीव गुदमरतोय..
अन् खऱ्याखुऱ्या भुकेपाई
भाकरीचा तुकडा थरथरतोय..
                copyright गणेश खरात, जालना
                                     ९०२८११०५०९ भाकरीचं मनोगत..
भाकरीचं मनोगत..

मातीत दाणे उपजून
काळ भूकेचा आला,
अन् टीचभर पोटापाई
जन्म माझा झाला..

श्रीमंत असो वा गरीब
भाकरीवाचून पारखा आहे,
जगातल्या प्रत्येक घरात
आकार माझा सारखा आहे..

मातीशी इमान राखून
मी दुष्काळही भागवलाय,
कधी अर्धी-चतकोर होऊन
इथं माणूस जगवलाय..

घामाच्या प्रत्येक थेंबाला
सुखाचा वास येतो..,
इथं प्रत्येक राबणारा 
भाकरीचा घास घेतो...

जेंव्हा रस्त्यावरचा भिकारी
मला पोटभरून खातो,
माझ्या भाकरीच्या जन्माचा
तेंव्हा ऊर भरून येतो...

आजच्या चमचमीत पदार्थांनी
माझा जीव गुदमरतोय..
अन् खऱ्याखुऱ्या भुकेपाई
भाकरीचा तुकडा थरथरतोय..
                copyright गणेश खरात, जालना
                                     ९०२८११०५०९ भाकरीचं मनोगत..

भाकरीचं मनोगत..