Nojoto: Largest Storytelling Platform

पांग या स्त्री जन्माचे 03 March 2021 13:59 गहिवर

पांग या स्त्री जन्माचे

03 March 2021
13:59

गहिवरला ह्या दाही दिशा मनी
उमटते वण जणू घणाचे घाव तनी
घरेलु हिंसा आजही स्त्री सोसते
कधी फिटतील पांग या स्त्री जन्माचे

हरणांच कळप बागडे स्वच्छंद वनात
पाहून मन मोहणारे  दृश्य हे रानात
टिपल्या ह्या क्रूर सिंह शिकारीच्या नजरा
कधी फिटतील पांग स्त्री या जन्माचे

आघात झाला भास्करा चा ज्वाले परि आज
माथी कलंक नि  अग्नीची झोंबे ती आग उरी
पेटूनी आग तरी उरती निखारे  हा कोणता न्याय?
कधी फिटतील पांग स्त्री या जन्माचे

नको पडू या दुपट्टी दावास तू आज
एकवटून सारे नारीशक्ती चे बळ
बन आवाज तू अन्यायाचे विरोधात
नि फेड पांग स्त्री या जन्माचे

लिंग भेद  नि असमानतेचे वर्दळ चहुदिशी
वेष हे मानव निर्मित असे या धरेवरी
घे लेखणी हाती नी हो नारी शक्तीचे प्रतिक
फिटतील पांग तुझ्या या स्त्री जन्माचे

येतील वादळे अनंत स्त्री जीवना च्या वाटी
खंबीर बनुनी कर या तुफानांवर तू स्वारी
घे मशाल न्याय नि समतेची तुझ्या हाती
साकार होईल पांग तुझ्या या स्त्री जन्माचे

©Jaymala Bharkade #स्त्री
पांग या स्त्री जन्माचे

03 March 2021
13:59

गहिवरला ह्या दाही दिशा मनी
उमटते वण जणू घणाचे घाव तनी
घरेलु हिंसा आजही स्त्री सोसते
कधी फिटतील पांग या स्त्री जन्माचे

हरणांच कळप बागडे स्वच्छंद वनात
पाहून मन मोहणारे  दृश्य हे रानात
टिपल्या ह्या क्रूर सिंह शिकारीच्या नजरा
कधी फिटतील पांग स्त्री या जन्माचे

आघात झाला भास्करा चा ज्वाले परि आज
माथी कलंक नि  अग्नीची झोंबे ती आग उरी
पेटूनी आग तरी उरती निखारे  हा कोणता न्याय?
कधी फिटतील पांग स्त्री या जन्माचे

नको पडू या दुपट्टी दावास तू आज
एकवटून सारे नारीशक्ती चे बळ
बन आवाज तू अन्यायाचे विरोधात
नि फेड पांग स्त्री या जन्माचे

लिंग भेद  नि असमानतेचे वर्दळ चहुदिशी
वेष हे मानव निर्मित असे या धरेवरी
घे लेखणी हाती नी हो नारी शक्तीचे प्रतिक
फिटतील पांग तुझ्या या स्त्री जन्माचे

येतील वादळे अनंत स्त्री जीवना च्या वाटी
खंबीर बनुनी कर या तुफानांवर तू स्वारी
घे मशाल न्याय नि समतेची तुझ्या हाती
साकार होईल पांग तुझ्या या स्त्री जन्माचे

©Jaymala Bharkade #स्त्री