Nojoto: Largest Storytelling Platform

एकांत हवा ....... कधीतरी मनातले प्रश्न सोडविणारा क

एकांत हवा .......
कधीतरी मनातले प्रश्न सोडविणारा
कधी स्वतःलाच स्वतःची ओळख करून देणारा 
एकांत हवाच.....

एकांत हवा,............
विचारांची देवाण-घेवाण करणारा
तर कधी असंख्य विचारांची साठवण करणारा
एकांत हवाच.....

एकांत हवा....
मनसोक्त जगणारा
तर कधी मनाच्या कोपऱ्यात आठवणी जपणारा
एकांत हवाच.....
 
एकांत हवा.......
केलेल्या चुकांची जाणीव घडवणारा
तर कधी चुकीचं काय हे स्वतःलाच समजवणारा
एकांत हवाच.....

एकांत हवा ........
सुखाच्या क्षणांची ओवी गाणारा
दुःख मागे सारून मनाला आनंदाची उभारी देणारा
एकांत हवाच.....

एकांत हवा.... 
त्याच्या सवे प्रेमगीत गाणारा
तर कधी नकळत त्याच्या प्रेमात रंगून जाणार
एकांत हवाच.....

एकांत हा असाच हवा
फुलासारखं फुलणारा 
तर कधी अत्तरासारखं मनमोहपणे दरवळणारा
एकांत हवाच.....

-#RIद्धी✒️


.

©Dipesh Gulekar
एकांत हवा .......
कधीतरी मनातले प्रश्न सोडविणारा
कधी स्वतःलाच स्वतःची ओळख करून देणारा 
एकांत हवाच.....

एकांत हवा,............
विचारांची देवाण-घेवाण करणारा
तर कधी असंख्य विचारांची साठवण करणारा
एकांत हवाच.....

एकांत हवा....
मनसोक्त जगणारा
तर कधी मनाच्या कोपऱ्यात आठवणी जपणारा
एकांत हवाच.....
 
एकांत हवा.......
केलेल्या चुकांची जाणीव घडवणारा
तर कधी चुकीचं काय हे स्वतःलाच समजवणारा
एकांत हवाच.....

एकांत हवा ........
सुखाच्या क्षणांची ओवी गाणारा
दुःख मागे सारून मनाला आनंदाची उभारी देणारा
एकांत हवाच.....

एकांत हवा.... 
त्याच्या सवे प्रेमगीत गाणारा
तर कधी नकळत त्याच्या प्रेमात रंगून जाणार
एकांत हवाच.....

एकांत हा असाच हवा
फुलासारखं फुलणारा 
तर कधी अत्तरासारखं मनमोहपणे दरवळणारा
एकांत हवाच.....

-#RIद्धी✒️


.

©Dipesh Gulekar