शीर्षक : मृगजळ कधी गूढ कधी मोकळा श्वास मन मंदिरी मज होतो भास केविलवाण्या नजरेत माझ्या, त्या मृगजळाचा सहवास क्षणात गुंतलो कसा मी की एकटाच मनात हसलो ओढ त्याची मज लागता मी एका ईशाऱ्यात फसलो पाहून ते मनमोहक रूप निर्भीड नेत्रही पाणावले सत्यात आता काही दिसेना अबोल मन शोधात भारावले खेळ कोणी हा खेळला का आभास मनी जाहला विचारुनी मीच स्वतः ला तो मृगजळ आज पाहला. प्रयाग पवार ©prayag pawar #Parchhai #मृगजळ