Nojoto: Largest Storytelling Platform

फार मजेदार असतात ना प्रेमासारख्या गोष्टी ऐकतांना क

फार मजेदार असतात ना प्रेमासारख्या गोष्टी
ऐकतांना कुणी सहसा होत नाही दुःखी कष्टी

त्याची नि तिची नजरानजर होते; आणि मग
एकमेकांस भेटल्यावाचून ती धरत नाही तग

सहजासहजी मिळेल ते प्रेम कसलं नि काय
कुण्यातरी खलनायकाचा रोवला जातो पाय

संकटांची मालिका अशी जुंपली जाते अपार
बिच्चाऱ्या नायक नायिकेला कष्ट पडते फार

पण कसल्याही संकटांना न जुमानणारी प्रेमी
प्रेम अटळ, अबाध्य असल्याची देतातच हमी

एवढं सगळं करून कुणाचं प्रेम यशस्वी ठरतं
तर कुणाचं फसतं, कुणाचं सरणावरी जळतं

प्रेम अजरामर होतं; हृदयास जाऊन भिडतं
त्यातूनच प्रितीचं कवडसं हृदयातळी उमलतं 

अशी ही प्रेमाची गाथा सुंदर, सुफळ, सुकष्टी
मातीतून पुन्हा उगवते; लीन होते ती देहयष्टी शुभ संध्या मित्र/मैत्रिणींनो,

आजचा विषय आहे,
प्रेमासारख्या गोष्टी...

#प्रेमासरख्या #गोष्टी 
#collab #yqtaai
फार मजेदार असतात ना प्रेमासारख्या गोष्टी
ऐकतांना कुणी सहसा होत नाही दुःखी कष्टी

त्याची नि तिची नजरानजर होते; आणि मग
एकमेकांस भेटल्यावाचून ती धरत नाही तग

सहजासहजी मिळेल ते प्रेम कसलं नि काय
कुण्यातरी खलनायकाचा रोवला जातो पाय

संकटांची मालिका अशी जुंपली जाते अपार
बिच्चाऱ्या नायक नायिकेला कष्ट पडते फार

पण कसल्याही संकटांना न जुमानणारी प्रेमी
प्रेम अटळ, अबाध्य असल्याची देतातच हमी

एवढं सगळं करून कुणाचं प्रेम यशस्वी ठरतं
तर कुणाचं फसतं, कुणाचं सरणावरी जळतं

प्रेम अजरामर होतं; हृदयास जाऊन भिडतं
त्यातूनच प्रितीचं कवडसं हृदयातळी उमलतं 

अशी ही प्रेमाची गाथा सुंदर, सुफळ, सुकष्टी
मातीतून पुन्हा उगवते; लीन होते ती देहयष्टी शुभ संध्या मित्र/मैत्रिणींनो,

आजचा विषय आहे,
प्रेमासारख्या गोष्टी...

#प्रेमासरख्या #गोष्टी 
#collab #yqtaai

शुभ संध्या मित्र/मैत्रिणींनो, आजचा विषय आहे, प्रेमासारख्या गोष्टी... #प्रेमासरख्या #गोष्टी #Collab #yqtaai #YourQuoteAndMine