परजीवी नाती आता ती पण कामाला जाते आणि तो पण आता एकटं असतं घर दिसायला असतं टापटीप पण मनात पसारा घरभर वेळच नसतो कुणाला या सुंदर घरट्यासाठी उमलल्याच कळ्या तर, त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांना फुलताना पाहण्यासाठी अशी ही वाढत चाललीयेत परजीवी नाती, परजीवी नाती... - मनिष ज्ञानदेव कानडे #परजीवीनाती#