Nojoto: Largest Storytelling Platform

*अंधारल्या दाही दिशा* ********************** नभ भर

*अंधारल्या दाही दिशा*
**********************
नभ भरूनिया आलं
अंधारल्या दाही *दिशा,*
कोठे जाऊ कळे मनाला
सर्वदूर दिसे फक्त *दुर्दशा.*

अंतरीची वेदना बोचत
काळजावर खोल *रुते,*
ठाव मनी ना लागतसे
भाव सारे झाले *रिते.*

निसर्गाच्या पुढे सारे
सारेच हतबल *होतात,*
मग मनुष्य जन्माचे
काय घेऊन *बसलात.*

जीवनात चढउतार  असे
नेहमी येतच *असतात.*
खडतर जीवनात जणू
मार्ग शोधून *फिरतात.*


आयुष्यात बरेच काही असते
ते मिळविण्याचा प्रयत्न *करा,*
अंधारल्या दशदिशांत आता
एकदा पुढे चालून पहा *जरा.*
----------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
    -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke अंधारल्या दाही दिशा

#alone
*अंधारल्या दाही दिशा*
**********************
नभ भरूनिया आलं
अंधारल्या दाही *दिशा,*
कोठे जाऊ कळे मनाला
सर्वदूर दिसे फक्त *दुर्दशा.*

अंतरीची वेदना बोचत
काळजावर खोल *रुते,*
ठाव मनी ना लागतसे
भाव सारे झाले *रिते.*

निसर्गाच्या पुढे सारे
सारेच हतबल *होतात,*
मग मनुष्य जन्माचे
काय घेऊन *बसलात.*

जीवनात चढउतार  असे
नेहमी येतच *असतात.*
खडतर जीवनात जणू
मार्ग शोधून *फिरतात.*


आयुष्यात बरेच काही असते
ते मिळविण्याचा प्रयत्न *करा,*
अंधारल्या दशदिशांत आता
एकदा पुढे चालून पहा *जरा.*
----------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
    -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke अंधारल्या दाही दिशा

#alone