Nojoto: Largest Storytelling Platform

मेघांच्या रेघांमधले घनकंप जणू झाकून, धरतीस पुसे खु

मेघांच्या रेघांमधले
घनकंप जणू झाकून,
धरतीस पुसे खुशाली 
आभाळ हळूच वाकून..

खोडल्या सात रंगांचे, 
जमवते मेळ हे चोख, 
मोडल्या भग्न रेषांचे
मांडते खेळ सुरेख..

काहूर असे लपवून, 
चुपचाप लयीत गुणगुणते,
आभाळ इतुके समजूतदार..,
का कुणास ठाऊक-
कोणत्या वयात, बनते? #आभाळमनातलं
मेघांच्या रेघांमधले
घनकंप जणू झाकून,
धरतीस पुसे खुशाली 
आभाळ हळूच वाकून..

खोडल्या सात रंगांचे, 
जमवते मेळ हे चोख, 
मोडल्या भग्न रेषांचे
मांडते खेळ सुरेख..

काहूर असे लपवून, 
चुपचाप लयीत गुणगुणते,
आभाळ इतुके समजूतदार..,
का कुणास ठाऊक-
कोणत्या वयात, बनते? #आभाळमनातलं