Nojoto: Largest Storytelling Platform

गझल ... !! ****** वृत्त : रसना लगावली : गागालगा लग

गझल ... !!
******
वृत्त : रसना
लगावली : गागालगा लगालगा गागालगा लगा

आणून हाच दे भला हा मोगरा मला
मोजून दात घे म्हणाला सोयरा मला
**
घेऊ नभात चांदणे खेळावया गडे
खेळात ही हवा हवासा कोपरा मला
**
नादात मी तुझ्या कसा बेभान जाहलो
श्वासात भासला श्वास हा बोचरा मला
**
सारे कसे मनामनाचे भेटणे जरी...
आवाज भासतो तुझा हा तोतरा मला
**
या वीरहात मी नशेला यार जाहलो
वेडात आण तू नशेला धोतरा* मला
**
गातेस रोज तू जरी गाणी प्रितीतली
देशील का तुझा गळा तो घोगरा मला
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054
------->
*  धोतरा एक विषारी फुल जे महादेवाला प्रिय आहे. आणून दे भला मोगरा ## गझल ## वृत्त ## रसना
गझल ... !!
******
वृत्त : रसना
लगावली : गागालगा लगालगा गागालगा लगा

आणून हाच दे भला हा मोगरा मला
मोजून दात घे म्हणाला सोयरा मला
**
घेऊ नभात चांदणे खेळावया गडे
खेळात ही हवा हवासा कोपरा मला
**
नादात मी तुझ्या कसा बेभान जाहलो
श्वासात भासला श्वास हा बोचरा मला
**
सारे कसे मनामनाचे भेटणे जरी...
आवाज भासतो तुझा हा तोतरा मला
**
या वीरहात मी नशेला यार जाहलो
वेडात आण तू नशेला धोतरा* मला
**
गातेस रोज तू जरी गाणी प्रितीतली
देशील का तुझा गळा तो घोगरा मला
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054
------->
*  धोतरा एक विषारी फुल जे महादेवाला प्रिय आहे. आणून दे भला मोगरा ## गझल ## वृत्त ## रसना