Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊलखुणा मागे मागे आपल्या चालतात, साथ आपली मरेपर्य

पाऊलखुणा
मागे मागे आपल्या चालतात,
साथ आपली मरेपर्यंत सोडत नसतात,
त्या आपल्या स्वतःच्या पाऊलखुणा असतात...

विश्वास ठेवायचा असेल तर
ठेवा आपल्या पाऊलखुणावर...
वळण कितीही कठीण असले तरी,
मागे येतीलच त्या तुमच्याबरोबर...

तुम्ही जिथे जिथे जाल,
तिथे सोबत तुमच्या त्या येतील .
कोणी साथ देवो ना देवो,
त्या नेहमी तुमच्या मागे असतील

©Priyanka Jaiswal
  पाऊलखुणा

पाऊलखुणा #Poetry

81 Views