Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नातील जगातून बाहेर ये दादा इतिहासाच्या चिंद्य

स्वप्नातील जगातून बाहेर ये दादा
इतिहासाच्या चिंद्यातून बाहेर ये दादा।।धृ।।

भाळावर आली चंद्रकोर चाकरी
बुटीत नाही चतकोर भाकरी
वाढवून दाढी पिळतोय मिश्या
बेकारीच्या नावाने मारतोय माश्या
राजकीय भोवऱ्यातुन बाहेर ये दादा।।१।।

 न्यायासाठी  धर गांधीबाबाची काठी
फुले शाहूंचा विचार घेउन पाठी
देशाहिताचा चालवोनी रहाट
हरितक्रांतीची उजळोनी पहाट
अज्ञानाच्या भोवऱ्यातून बाहेर ये दादा।।२।। विवंचना
स्वप्नातील जगातून बाहेर ये दादा
इतिहासाच्या चिंद्यातून बाहेर ये दादा।।धृ।।

भाळावर आली चंद्रकोर चाकरी
बुटीत नाही चतकोर भाकरी
वाढवून दाढी पिळतोय मिश्या
बेकारीच्या नावाने मारतोय माश्या
राजकीय भोवऱ्यातुन बाहेर ये दादा।।१।।

 न्यायासाठी  धर गांधीबाबाची काठी
फुले शाहूंचा विचार घेउन पाठी
देशाहिताचा चालवोनी रहाट
हरितक्रांतीची उजळोनी पहाट
अज्ञानाच्या भोवऱ्यातून बाहेर ये दादा।।२।। विवंचना

विवंचना