गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺 🙏🏻 माझ्या घरी दिड दिवस गणपती बाप्पा असतात. पण ओढ महिनाभर आधिच लागलेली असते. नागोबा, पंचमी दिवशी जणू काही वर्दी द्यायलाच येतात. 8/10 दिवस आधीच चालू असते. खुपच उत्साह आणी आगमनाची उत्सुकता. दिवाळी पेक्षा जास्तच. 2 दिवस धमाल. आप्तेष्ट रहायला आणी मित्रमंडळींचा दिवसभर राबता. हेच निमित्त जे आमंत्रणाची अपेक्षा ही न करता भेटीगाठी होतात. अगदी वर्षातून एकदा येणाऱ्यांनाची पण ही ओढच ना. दर्शनाची.. भेटीची.. प्रसन्न वातावरणात पुजाआर्चा, आरत्या आणी त्या गोंडस रुपावर चढते तेज 🌹🌹 रांगोळी, सजावट, जेवणावळ, गोडधोड, गप्पा, गोधळ लहान मुलांचा,नाच,गाणी, खेळ असा चढत्या आणी ओसंडत्या उत्साहाला उधाण आलेले असते. समईच्या मंद प्रकाशात रात्र तर फारच प्रसन्न... तो प्रकाश पडलेली ती मुर्ती... मनोमन... निवांतपणे पहात रहायचे, निःशब्द गप्पा अंतर्मनातून शब्दच नाहीत व्यक्त व्हायला. ते रुप डोळ्यात साठवत, कधीतरी उत्तर रात्री निद्राधीन व्हायचे🙏🏻 दुसरे दिवशी पण संध्याकाळ पर्यंत गडबड.. पण एक अनामिक रुखरुख सुरु असते... निरोपाची वेळ जवळ येत चाललेली असते. आपण काय देणार त्या जगदात्याला... फक्त भक्ती... मग ती नैवेद्य, शिदोरी, आरती अश्या स्वरुपात व्यक्त होते. मग विसर्जनाला अश्रूंचा बांध फुटतोच.. डोळ्यांच्या कडा अपसुकच कधी ओलावतात.. नकळतच... टिपले जातात... आणी... गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🤗🙏🏻.. म्हणत सुरु असलेली लगबग... पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात शांत शांत होते..