मुक्याने बोलले पानावल्या कडा, विरहात पेटला, एकांतीचा वाडा.... दिशाहीन वाटही, हृदयातून रडली त्या वळणावरती, अश्रुंनीच नटली.... सुनी सुनी संध्या, कुरवाळते मनाला मुक्या शब्दानेच, जपते भावनेला.... नकळत अबोला स्वर्गफुलांनी दिला सुखद क्षणाचा हेवा करु कशाला.... स्वप्नांची ओंजळ रिकामीच झाली, कोमेजल्या कळीला, सुगंध देऊन गेली.... सौ गायत्री सोनजे,नाशिक