Nojoto: Largest Storytelling Platform

घाबरू नको, मी ठीक आहे। ह्या सर्व गोष्टींची, मला सव

घाबरू नको, मी ठीक आहे।
ह्या सर्व गोष्टींची, मला सवय आहे।।

कित्येकदा मोडलं मन, अन मोडला कणा।
तरी ताठ उभी राहून, जगते आहे बघा ।।

शिव्या, शाप, हे नवीन नाही ।
विषाचे प्याले, मी रोजच पित राही ।।

बाई, म्हणून जन्मले ना, भोगाव तर लागणारच।
जे जे होईल ते ते, सहन करावं लागणारच ।।

विसरते मीच, मनी इच्छा जागवते उगीच ।
नाही होणार त्या पूर्ण, हे माहीत असते आधीच ।।

काय लागत मला? दोन घास अन दोन जोडी कपडे ?
मान, सन्मान, प्रेम, कौतुक हे नको असते का ?

कित्येक वेळा मन मारून, मी जगायचं ?
खोट खोट चारित्र्य जपायचं ।।

मी ठीक आहे सख्या, मला काही होत नाही ।
मी कुठं सजीव आहे, म्हणून त्रास होत नाही ।।
 #व्यथा_स्त्री_की #माझीलेखणी #बाईपण

poojashyammore5208

pooja d

New Creator