Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याच्या प्रत्येक पाऊली एक नवा धडा मी शिकतो आहे

आयुष्याच्या प्रत्येक पाऊली
एक नवा धडा मी शिकतो आहे 
दुःख क्षणाचे स्वागत करताना
अन् सतत जनमाणसात जगताना 
मी खरंच मनातून हसलो आहे 
कितीक पाहिली रंगीत स्वप्ने मी
अन् आहेत कितीतरी अजूनही
माझ्या मनीच्या सुप्त आशा 
त्या जगताकडे जाता जाता
वाट नेहमीच मी चुकलो आहे 
बालपणाच्या गोष्टीत ऐकला होता
एक परी राज्याचा देश मी
आज त्याच देशीच्या वेशीवरी येता
मी किती जास्त थकलो आहे 
महाद्वार बंद अन चोख पहारा
तटाबाहेर अंधार निवारा 
सुप्रभातीचे पहिले कोवळे किरण
येता मी नेहमी तयापुढे झुकलो आहे 
त्या देशाची रमणीय कहाणी
गाऊन सांगे पक्षी गाणी 
त्या दुनियेची अनोखी अनोळखी ती
सफर कराया मी कधीचा बसलो आहे 
जीवन माझे व्यर्थ गेले
अजूनही तिला न डोळ्यांनी पाहिले आहे  
कधी करील का ती मनधरणी माझी
मी तर कधीचा रुसलो आहे 
गोड बोलणे लडिवाळ ते हसणे
अन् नयनांचे ते विभ्रम देखणे 
अशा बहुरूप्यांचे भेद जाणण्या
मी नेहमीच आजवर फसलो आहे
अन् जनमाणसात राहूनी सतत मी
आजही माणसांच्या गर्दीतला एक शापीत जोकर
हीच माझी नित्य ओळख मोठ्या
अभिमानानं जपतो आहे
आयुष्याचा प्रत्येक पाऊली
एक नवा धडा मी शिकतो आहे

©शब्दवेडा किशोर #एकटेपणा
आयुष्याच्या प्रत्येक पाऊली
एक नवा धडा मी शिकतो आहे 
दुःख क्षणाचे स्वागत करताना
अन् सतत जनमाणसात जगताना 
मी खरंच मनातून हसलो आहे 
कितीक पाहिली रंगीत स्वप्ने मी
अन् आहेत कितीतरी अजूनही
माझ्या मनीच्या सुप्त आशा 
त्या जगताकडे जाता जाता
वाट नेहमीच मी चुकलो आहे 
बालपणाच्या गोष्टीत ऐकला होता
एक परी राज्याचा देश मी
आज त्याच देशीच्या वेशीवरी येता
मी किती जास्त थकलो आहे 
महाद्वार बंद अन चोख पहारा
तटाबाहेर अंधार निवारा 
सुप्रभातीचे पहिले कोवळे किरण
येता मी नेहमी तयापुढे झुकलो आहे 
त्या देशाची रमणीय कहाणी
गाऊन सांगे पक्षी गाणी 
त्या दुनियेची अनोखी अनोळखी ती
सफर कराया मी कधीचा बसलो आहे 
जीवन माझे व्यर्थ गेले
अजूनही तिला न डोळ्यांनी पाहिले आहे  
कधी करील का ती मनधरणी माझी
मी तर कधीचा रुसलो आहे 
गोड बोलणे लडिवाळ ते हसणे
अन् नयनांचे ते विभ्रम देखणे 
अशा बहुरूप्यांचे भेद जाणण्या
मी नेहमीच आजवर फसलो आहे
अन् जनमाणसात राहूनी सतत मी
आजही माणसांच्या गर्दीतला एक शापीत जोकर
हीच माझी नित्य ओळख मोठ्या
अभिमानानं जपतो आहे
आयुष्याचा प्रत्येक पाऊली
एक नवा धडा मी शिकतो आहे

©शब्दवेडा किशोर #एकटेपणा