निरोप...! तीच संध्या तोच वारा... कोणीच काही बोलेना... वाट ती ओळखीची... साथीला आज चालेना... उगवला अंधार रानी... विचारतो अलबेल ना...? तीच संध्या तोच वारा... कोणीच काही बोलेना...! सारे काही ओळखीचे अनोळखी नजरेत मी आज कळले अर्थ सारे जाणलेत बेत मी शब्द सारे,स्पर्श सारे सोबतीला आणलेत मी भास का होतो मला ? आहे तुझ्या समवेत मी कितीदा तू होतीस सोबतीला आज एकटाच तुझ्याविना...! तीच संध्या तोच वारा... कोणीच काही बोलेना...! सोडूनी जाणारे सारे करतात असा डाव का? नाजूक त्या काळजाला देऊन जातात घाव का? रित हि जीवघेणी निरोपाची बदलून टाकुया आज का? शेवटचे बोलायचे आहे सांग मी इथेच थांबू का ? येतेस ना..नात्याचे बंध तोडू एकदा येशील ना.. येशील ना..! तीच संध्या तोच वारा... कोणीच काही बोलेना...! -संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #निरोप Vinod Ganeshpure