शांत वेळी, एकांत क्षणी लहरी मनात असते , काहुर मनी मन होते सागर, विचार लहरी येते स्पर्शून गगण लाटेवर लाट होऊन आरूढ,करी शब्दांचे मंथन मन सुन्न ते खोलात जाऊन पाय रूजवले मन भरून येते ,काय मिळवले, काय गमावले कळू न शकले द्विधा मनस्थितीत ह्रदयाला छेडले आपल्याच तंद्रीत का ते राहिले सूर्या सम अश्रू चमकू लागले अस्ता प्रमाने हळूहळू खाली ओघळू लागले ह्रदयाला शब्दांच्या लाटा, किनारा देत होता लाटांचा आवाज तो आवाज दाबत होता पूर्ण असूनही लाटा विना अपूर्ण होते जखम ही अंतरींची लाटेत वाहून देत होते आंधळ्या अ़धांरातही चंद्राची साथ होती चंद्र हा माझा एकांत अनुभव होता तो माझ्याशी जुळवून घेत होता अशांत वेळी शांत तो करत होता.. मिनाक्षी..