Nojoto: Largest Storytelling Platform

जिवंत असावं जगणं वागणं.. उगाच अळणी बेचव नको... अंग

जिवंत असावं जगणं वागणं..
उगाच अळणी बेचव नको...
अंगार असावा प्रेम असावं..
डोळ्यांत अकारण दव नको...

खरं बोल खरं वाग..
दिलास शब्द तर शब्दाला जाग..
करुणा ठेव हृदय मंदिरी..
नको असूया नको राग... 

मरायचं आहे विसरु नको..
मोह दिसता घसरू नको...
चाकर हो देवाचा पण..
कुठेही हात पसरू नको...

स्वाभिमान विकू नकोस..
नियतीवर रुसू नकोस...
चितेवर विश्रांती घ्यायचीच आहे..
जिवंतपणी उगा बसू नको...

निसर्ग सगळ्यांना कुशीत घेतो,
निसर्ग सगळ्यांचा सखा होतो..
भरभरुन जो सर्वांना देतो..
निसर्ग त्याच्यावर कृपाळू होतो...

Vishaal/Aadinaath 
02-03-2022







.

©Vishal Chavan Vishaal
जिवंत असावं जगणं वागणं..
उगाच अळणी बेचव नको...
अंगार असावा प्रेम असावं..
डोळ्यांत अकारण दव नको...

खरं बोल खरं वाग..
दिलास शब्द तर शब्दाला जाग..
करुणा ठेव हृदय मंदिरी..
नको असूया नको राग... 

मरायचं आहे विसरु नको..
मोह दिसता घसरू नको...
चाकर हो देवाचा पण..
कुठेही हात पसरू नको...

स्वाभिमान विकू नकोस..
नियतीवर रुसू नकोस...
चितेवर विश्रांती घ्यायचीच आहे..
जिवंतपणी उगा बसू नको...

निसर्ग सगळ्यांना कुशीत घेतो,
निसर्ग सगळ्यांचा सखा होतो..
भरभरुन जो सर्वांना देतो..
निसर्ग त्याच्यावर कृपाळू होतो...

Vishaal/Aadinaath 
02-03-2022







.

©Vishal Chavan Vishaal