Nojoto: Largest Storytelling Platform

###@वेळेचे समीकरण@### वेळ,हा शब्द ऐकायला खूप भारी

###@वेळेचे समीकरण@###

वेळ,हा शब्द ऐकायला खूप भारी वाटतो.हाच तो शब्द जो आपल्या आयुष्यात दुःख,सुख यांची समीकरणे तयार करत असतो.
       वेळ या विषयावर थोडा वेळ काढून लिहावं वाटत.वेळेला बंधने नसतात,पण वेळेमुळे प्रत्येक गोष्टी ज्या आयुष्यात घडत असतात त्यांना मात्र बंधने नक्कीच निर्माण होतात.आपण एकादी क्रिया त्या वेळच्या मर्यादेत राहूनच करतो.
आता प्रश्न पडतो की,आपल्याकडे वेळ आहे का आपण वेळेकडे आहोत?म्हणजे वेळेचे आपण गुलाम कि वेळ आपला गुलाम.कारण प्रत्येक गोष्ट ही वेळेला धरूनच ठरवली जाते.साहजिकच आपण ठरवतो कि एकादी गोष्ट करायचं,ते पण वेळेत होत की नाही हे माहिती नसतं. जसे की,आपण लहान असताना ठरवतो कि 10 वी उत्तीर्ण झालो कि मग काय एकदाच या या आयुष्यातून डोक्याला असलेला ताण निघून जाईल,पण ते खरच तस असते का?साहजिक च नाही.कारण तेव्हा तर आयुष्याला सुरवात होत असते,मग ठरवतो कि आयुष्य आणखी खूप आहे.हा कॉलेज वयीन जीवन संपले कि मग काय आनंद च आनंद,पण खरं पाहिलं तर आयुष्य हे याच काळात खऱ्या आयुष्याच्या कसोटीला सामोरे जाते,किशोरवयातून आपण तरुण वयाकडे जात असतो.मग वेळेनुसार आपल्या गरजा बदलत जातात.इतके दिवस आपण नाबालिक असल्याने आपले पोषण-पालन घरच्याकडन होत असत,पण वेळेच्या प्रमाणे पकडलं तर हीच ती वेळ असते,ज्या क्षणी आपल्याला आपल्या पायावर उभे व्हायचे असते.मग नोकरी ची शोधाशोध,न नोकरी मिळाली की झाली जिंदगी सेट असं वाटत असते.
     पण त्याच वेळी आयुष्यात एक वेगळाच न जीवनाला कलाटणी देणारा क्षण येतो,कारण नोकरी मिळालेली असते,तो प्रसंग जो आपल्याला बदलून टाकणारा असतो.क्षण तर खूप सुखिक असतो पण त्यानंतर येणारे वेगवेगळे जीवनातले टप्पे आपल्याला कुठेतरी ठप्प करून सोडणारे असतात.तोच तो संसार सुरु होतो...अन बगता बगता आयुष्य निघून जाते,अन एका दिवशी तेच होते जे प्रत्येकासोबत होते.
   " कहासे आये थे,क्या लाया थे,खाली आये थे,खाली जयोगें "म्हणाल्याप्रमाणे अखेर श्वासमुक्त होतो.
     थोडक्यात,प्रत्येक आयुष्यातली गोष्ट ही वेळ ठरवत असते,म्हणून हे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जागा,कारण एकदा गेलेले तुमचे परके,जवळचे परत येऊ शकतात,पण वेळ हि कधीच येऊ शकत नाही.
वेळेला पाठ फिरणवणे म्हणजे स्वतःच्या पायावर खंजीर खुपसून घेणे.
          "प्रत्येक गोष्टीला वेळेचा संदर्भ हवाच असतो,मग ते तुम्ही मान्य करा अथवा नका करू".
                                   -अमोल वाकसे(RJ) #Life#फंडे

amolwakse6785

Amol Wakse

New Creator

Lifeफंडे