सांग मना का रमला आहेस त्या जुन्या आठवणींत हे व्यवहारी जग मांडत राहते हिशोबाचे गणित निरखून पहा आणि उमजून घे ह्या संसाराच्या चालीरिती असतो केवळ करार येथे नसते कोणा प्रिती कधी तरी बाहेर पड तुझ्या स्वप्नरंजित विश्वातून कळेल तुला व्यथा माझी माझ्या खोट्या जगण्यातून सांग मना येशील का? माझी द्विधा समजून घेशील का ? अरुणोदय शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया.