तू पाहताच मला माझं लाजुन नजर झुकवणं मी पाहताच तुला तुझं हळूच हसणं तुझी नजर चुकवून तुला एकटक न्याहाळणं माझी ही चीरी तू नजरकैदेत पकडणं मी नसताना तुझ्या भिरभिरत्या नजरेचं मला शोधणं मला हि आवडायचं तुझं हे बघणं जीवघेणं हवाहवासा वाटायचा हा खेळ नजरेचा तुझ्या माझ्या प्रितीचा रंगच वेगळा नजर