Nojoto: Largest Storytelling Platform

माहेरची सय... (ओवी) माझ्या माहेराची वाट। सोनचाफ्य

माहेरची सय... (ओवी)

माझ्या माहेराची वाट। सोनचाफ्याचा गं घाट।
तिथ घाटामंधी माट। घेई जाता मी घोट ।।धृ।।

घोट घेते अमृताचा। त्यात गोडवा मायेचा।
गावच्या महादेवाचा। दिस तिथुन माचा ।।१।।

लागूण महादेवाला। वाडा बांन गं बांधीला।
भिंगरुळ्या कौलातला।गडकोट शोभीला ।।२।।

तिथं गोठ्यातली गाय। हंबरी पाहता माय।
येता माहेरची सय। कंठ दाटतो बाय ।।३।।

दाटलेल्या कंठामंधी। हुंदका काळजामंधी।
माहेरच्या मातीमंधी। माझ मन गं बंदी।।४।।

बंदी मनाची चाहूल।चाफ्याला गं आली फूल।
बाप न्हायला येईल। गं अडलं पाउल ।।५।।

कवीराज।
८६९८८४५२५३ माहेरची सय.... (ओवी)
माहेरची सय... (ओवी)

माझ्या माहेराची वाट। सोनचाफ्याचा गं घाट।
तिथ घाटामंधी माट। घेई जाता मी घोट ।।धृ।।

घोट घेते अमृताचा। त्यात गोडवा मायेचा।
गावच्या महादेवाचा। दिस तिथुन माचा ।।१।।

लागूण महादेवाला। वाडा बांन गं बांधीला।
भिंगरुळ्या कौलातला।गडकोट शोभीला ।।२।।

तिथं गोठ्यातली गाय। हंबरी पाहता माय।
येता माहेरची सय। कंठ दाटतो बाय ।।३।।

दाटलेल्या कंठामंधी। हुंदका काळजामंधी।
माहेरच्या मातीमंधी। माझ मन गं बंदी।।४।।

बंदी मनाची चाहूल।चाफ्याला गं आली फूल।
बाप न्हायला येईल। गं अडलं पाउल ।।५।।

कवीराज।
८६९८८४५२५३ माहेरची सय.... (ओवी)

माहेरची सय.... (ओवी) #Quote