आयुष्याचे गणितं जरा चुकल्यासारखे वाटत आहे सगळेच आपले आहे तरीसुध्दा सगळे परक्यासारखे वाटत आहे माणसांचा पूर वाहत असतांनाही त्या गर्दीत एकटं एकटं वाटत आहे नाती गोती मित्र प्रेम सगळंच सुटल्यासारखं वाटत आहे जी पायवाट मी गाठली, ती चकव्यासारखी वाटत आहे ज्या जागी मी थांबलो, ते गाव अनोळखीसारखं वाटत आहे समुद्राने तहान भागवली नाही आकाशाने कधी पंख दिले नाही स्वपनांनी कधी झेप घेतली नाही किती अपुरं अपुरं वाटत आहे आज खरंच आयुष्य जरा चुकल्यासारखं वाटत आहे rakeshkavita.blogspot.in राकेश शिंदे. आयुष्याचे गणितं #marathiShayari #MarathiPoem #MarathiKavita #Aayushya #NojotoShayari #NojotoPune #NojotoPoem #NojotoKavita #RakeshShinde