Nojoto: Largest Storytelling Platform

निचपणाचा कळस औरंग्या तो शिवपुत्र शंभू राजासमोर हार

निचपणाचा कळस औरंग्या तो
शिवपुत्र शंभू राजासमोर हारला होता.
काय करावे,कसे पकडावे संभास हे
हे विचार करत थकला होता.
शेवटी काय दगा फटका करत संभाजीस
पकडावे हेच ठरविले होते,
करीत कट कारस्थान कपटाने त्याने
संभाजीस घेरले होते.
खूप छळले त्यांस,मरण यातना ही दिल्या फार,
म्हणे स्वराज्य दे,नाक घास,आणि धर्म ही आमचा स्वीकार.
हार मानेल तो राजा कसला,
शंभू राजे होते ते औरंग्याचा डाव फसला.
दिली शिक्षा म्हणे किंकाळी ऐकायची आहे
ह्या संभाची,
गरम लालबुंद सळया टाका डोळ्यात ह्याच्या
आणि ऐकवा आम्हास किंकाळी ह्या संभाची.
पण शूर शिवबाचा शूर छावा तो इथेही न घाबरला,
लालबुंद तप्त सळई डोळ्यात जाऊनही शांत राहिला,
उलट हसवुनी दाखवीत शत्रूला जिवंतपणीच मारीला.
कसला तो प्रसंग होता खूप वेदना होत असतानाही राजा आमचा हसत होता,
आणि औरंगजेब मात्र वैरी समोर असतानाही हतबल झाला होता.
शंभूराजे आमचे ते औरंग्यास चांगलेच नडले होते,
असंख्य वेदना शरीरावर होऊनही लढले होते.

#योगेश आ आ# #संभाजीराजे #संभा #स्वराज्यरक्षक