Nojoto: Largest Storytelling Platform

#आनंदयात्री रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात

#आनंदयात्री
रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात पाहिलं आणि सहजच गुणगुणलो
"आज मैं उपर आसमा नीचे"
हा माझा बालपणीचा पावसाळ्यातील छंद, आभाळाला कवेत घेताना स्वर्गीय आनंद व्हायचा, सूर मारुन आकाशाला गवसणी घालाविशी वाटायची. बालपण सरलं आणि पायाखालचं आभाळच फाटलं. वाढत्या जाणिवांनी जमिनीशी नातं सांगताना आकाशाशी जडलेली नाळ कापून टाकली आणि माझं आभाळ पारखं झालं मला.आता जमिनीवरची लढाई लढत माझं आभाळ शोधतोय. सारं काही आनंदासाठी....

मैत्रेय(अंबादास) #आभाळ