प्रेम हे प्रेम असते हृदयात उमललेले फुल असते स्पंदनात त्याला जपायचे असते भावनांना साद देऊन श्वासात त्याला भरायचे असते प्रेम हे प्रेम असते नको त्याला ते जरूर होते सुंदर कल्पना ती जवळ येते हव्या हव्या त्या गोड जगात घेऊन जाते नकळत घडणारी ती गोष्ट असते प्रेम हे प्रेम असते प्रेमाची व्याख्या ती शब्दात असते रुसवा फुगव्या ती कळते एका नजरेसाठी व्याकूळ झालेली नजर ती असते त्याच्यासाठी आतुरलेले प्रेम असते कधी सावरून घेणे ते असते आयुष्यभर साथ देण्यासाठी थांबलेलं ते प्रेम असते प्रेम हे प्रेम असते, त्या साठी प्रेमात पडावे लागले गुलाबी ती उधळ अनुभवावी लागते फुलोरा तो नजरेने फुलवायचा असतो कधी जवळ राहून,तर कधी दूर राहून करावे लागते