White दररोज अंगवळणी असले तरी एखादी पायरी एखाद्या वेळी चुकते मग चुकत जातात हळूहळू शंका कुशंकांची त्रिकोणे आणि आपला शोध फिरत राहतो गोल गोल, गोल गरगरीत वर्तुळाच्या परिघावर माणसं येतात, स्पर्शून जातात स्पर्शिकां सारखी, वर्तुळ भेदू शकत नाहीत आपण आतच अडकून पडतो चक्रव्यूहात...अभिमन्यू बनून गावात प्रेमाचा पूर येतो, कविता वाहतात गाव उध्वस्त होते, पूर ओसरून जातो मागे उरतो, तो फक्त आठवांचा चिखल गावात पसरलेला भावनांचा कुबट वास विश्वासाच्या उडालेल्या चिंधड्या चिटकून राहतात प्लास्टिक सारख्या...बाभळीला ©‼️प्रणाली कावळे‼️ #Sad_Status रवी राजदेव प्रा.शिवाजी ना.वाघमारे