Nojoto: Largest Storytelling Platform

एकटेपणाचे हे जीव घेणे तट तू आता भराभर ढासळून टाक

एकटेपणाचे हे जीव घेणे तट 
तू आता भराभर ढासळून टाक 
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी 
फाटलेल्या आभाळाला 
टाके घालून सांधण्यासाठी 
कारण 
आता मी माझ्याकडचा रस्ता 
झाडून पुसून साफ केला आहे 
तुझ्या पायातल्या 
मुक्या पैंजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी 

(प्रशांत काळे) शब्द काही तुझे काही माझे
एकटेपणाचे हे जीव घेणे तट 
तू आता भराभर ढासळून टाक 
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी 
फाटलेल्या आभाळाला 
टाके घालून सांधण्यासाठी 
कारण 
आता मी माझ्याकडचा रस्ता 
झाडून पुसून साफ केला आहे 
तुझ्या पायातल्या 
मुक्या पैंजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी 

(प्रशांत काळे) शब्द काही तुझे काही माझे