मीच माझ्या वांझ मनाशी एक करार केला आहे श्वासापुरते जगणे केवळ लयास माणूस गेला आहे... नकोच उसन्या सुखदुःखाची रंगीत झालर चमचमणारी श्रावण सरता वैशाखाची दाह,होरपळ धूसमुसणारी... रोज पाहतो त्याच राऊळी तीच प्रभावळ तो वनमाळी लोभ, वासना दंभपणाची भणंग घेऊन फिरतो झोळी... कांगोऱ्यांनी सजले –नटले खुले अंगण निळ्या नभाचे बिंब उमटता रक्त वर्णी ते कोश लोपले गर्द ढगाचे... उगाच वाटे डोळ्यामधला पाझर आता आटून गेला किती पेरले कोंब तरीही तळ मनाचा सुकून गेला... एकच जीवन एकच जगणे एक धून पण कैक तराने रंगमंच हा युगा युगांचा पडदा पडता येणे– जाणे... ©Shankar Kamble #माणूस #माणूसम्हणूनजगताना #जीवन #लढा #जगणं #अस्तित्व #प्रेम #चिंतन