Nojoto: Largest Storytelling Platform

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या क

हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या केसांसारखे 
उगवून येतात माथ्यावर जटील 
मोकळ होता येत नाही 
श्वासांच्या श्वापदांना 
व्यवस्थेच्या छिनाल हरकती 
कुठल्या मुळावर पोसत असतील ?
का उगवून येत असतील  
मनाच्या फांदीला 
अश्लील बांडगुळाचे हिरवे कोंब ?
व्यथेचा जथा 
कधी थांबत नाही रहदारीच्या मुक्कामाला 
एकांतालाच कळून येतं 
जगण्याचं शहाणपण...
तरीही 
हंगामाचं गाव आलं की 
पाय दचकून जातात वयाच्या वेशीवर .

-विष्णू थोरे  
९३२५१९७७८१ हंगामाचं गाव ..


दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या केसांसारखे 
उगवून येतात माथ्यावर जटील 
मोकळ होता येत नाही 
श्वासांच्या श्वापदांना 
व्यवस्थेच्या छिनाल हरकती 
कुठल्या मुळावर पोसत असतील ?
का उगवून येत असतील  
मनाच्या फांदीला 
अश्लील बांडगुळाचे हिरवे कोंब ?
व्यथेचा जथा 
कधी थांबत नाही रहदारीच्या मुक्कामाला 
एकांतालाच कळून येतं 
जगण्याचं शहाणपण...
तरीही 
हंगामाचं गाव आलं की 
पाय दचकून जातात वयाच्या वेशीवर .

-विष्णू थोरे  
९३२५१९७७८१ हंगामाचं गाव ..


दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
vishnuthore9723

vishnu thore

New Creator

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड.