Nojoto: Largest Storytelling Platform

रहस्यमय सीतार फार काळ लोटला पाणलोट राज्याचा कारभार

रहस्यमय सीतार
फार काळ लोटला पाणलोट राज्याचा कारभार आता सेनापती बापट यांच्या कडे गेला होता..बापट यांचे आपल्या प्रजेवर फार प्रेम...त्यांचे प्रत्येकाकडे अर्थात राज्यातल्या प्रत्येक व्यक्ति कडे विशेष प्रेममय लक्ष् असायच..बापट यांची पत्नी सौ उर्मिला श्रीनिवास बापट यांना संगीताची फारच आवड...तेवढ्यात राजकन्या विनिअभिमन्यूमा चा जन्म झाला आणि सर्वच बदले..तो दिवस होता 22 डिसेंबर 1975,सूरमयी सोनेरी किरणांनी उजळून आलेली ती पाहाट घेऊन आली होती बापट यांच्या घरी एक रहस्यमय सागरतलाशी असलेली लाट...राजकन्या दिसायला एकदम गोड पन बोलायला मात्र सरळ स्पष्ट...जणूकाही कडकलक्ष्मी...आईला संगीताची उत्तम जाण होतीच...आणि कला क्षेत्रात रस होताच...त्यामुळे राजकन्येला सुद्धा सीतार वादनाची फारच आवड...बर ही आवड निर्माण होण्यामागच रहस्य म्हणजे मिराबाई...आणि त्यासोबतच कला क्षेत्रातील तिची आवड बघताबघता तिच्या 10 व्या जन्मदिनानिमित्त राजा बापट आणि आई उर्मिला हिने तिला एक सीतार भेट म्हणुन दिली...आता विनिअभिमन्यू ही फार चिडकी...एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की लगेच मोमबतिचि इकडे पेटायला सुरुवात झालीच समजा...पन मनाने मात्र एकदम पवित्रा होती ती..तिचे डोळे म्हणजे बघता क्षणी रहस्यात गूढ करणारे ...पापण्या नुस्त्या लुकलुकत असायच्या ...नजर एकदम कडक...ती एकदम अशी सतत स्वतामध्ये ,स्वताच्या विचारात रंगून असायची...तिला नृत्याची सुद्धा फार आवड...आणि नेहमी प्रमाणे ती आपल्या नृत्यात आणि सीतार वादनात इतकी गाढ रमायचि की तिच्या खोलीत जणूकाही सरस्वती प्रवेश करीत असल्याचा भास व्हायचा ...थोडक्यात ती एक रहस्यमय राजकुमारी होती...
दिवाळीचा दिवस होता , नेहमीप्रमाणे बापट यांनी राजकुमारी ला बोलावले आणि जंगल सैर करण्याचा प्रस्ताव मांडला ...राजकन्या आज सक्त नकारास टेकते ...तिचे हे वेगळे वागणे बघून राजा बापट विचारात पडतो...आज नेमके काय बिनसले हिचे ही सक्त जंगल सफारीला विरोध करतेय...हे बघून बापट थोडा विचारात पडतो...आणि इकडे राजकन्येच्या नेहमीच्या रहस्यमय विचारांचा पाऊस सुरू होतो...आज तर काही वेगळेच...राजकन्या नेहमी प्रमाणे सीतार हातात पकडून वाजविण्यास सुरुवात करते बघतो तर काय ती अश्या जागी जाऊन पोहोचते जिथे फक्त आणि फक्त कोकिळेचा मधुर आवाज, हिरवेगार रान, निखळ पाण्याचे आवाज ,आणि स्वच्छ पाण्याचा सागरी किनारा.,इवले इवले पक्ष्यांचे थवे जणूकाही निर्माण करत असणारे प्रेम दुवे,,आजूबाजूला सोनेरी फुलपाखरांची किलबिल, फुलझाडांची तिच्यासोबत जणूकाही गट्टीच जमली होती.,तिच्या सीतार वादनाने गवताची पेंढी वाढत जायची.,जिथे पर्वत सुद्धा दाही दिशांनी असे चमकून धबधब्यात  स्वतःचे प्रतिबिंब बघत होते.,इकडे तिकडे पसरलेली कोवळी किरणे जणूकाही तिला हलकीशी ऊब देत होती, निसर्ग क्षणात तिच्या भोवती हेलकावे घालत होता..त्या ठिकाणी ती आणि तिची सीतार सर्वांना मंत्रमुग्ध करत होती...ती जसजशी समोर जायची ,जाई जुई तिच्यासाठी तेवढ्याच जलद गतीने बहरून उमलायच्या ..ते जग म्हणजे तिला हवी असलेली शांतता..क्षणात वाटले तिला की ह्या स्वप्नाळू जगात फक्त ती एकटीच असेल.,पन समोर जाताच तिचा हात पकडणारा जोडीदार तिला ह्या नव्या जगात भेटतो...तो आणि ती अशी एक वेगळीच दुनियादारी..वाट चालता चालता काही संपेना मग तिने एक प्रश्‍न विचारला हे माते हे जग अनोळखी पन किती आपलेसे ,एक 
वेगळीच शांतता भासते आहे, त्या दरम्यान त्या दोघांचा एकमेकांशी विवाह होतो आणि बघतो तर काय जसा विवाह संपन्न झाला इकडे तो तिच्या पायाचे घुंगरू बनून बसला होता.,त्याच वेळी एक भयंकर आकाशवाणी होऊन समजत की ह्या प्रवासात जो कोणी भेटतो तो आपल्याशि एक खास नात बनवून जातो.,आणि मग ती दुखी होऊन परत सीतार
 वाजविण्यास सुरुवात करते तोच बघतो तर काय ते घुंगरू पुन्हा तिचा राजकुमार बनून जातो..ह्या प्रमाणे ती त्याला परत तर मिळवते पन एका अटीवर की ज्या दिवशी ती तिची सीतार वाजवणे बंद करेल त्या दिवशी तो परत घुंगरू बनून तिला नृत्यात मदत करेल...आणि त्याच्या साठी ती आजपर्यंत त्या जगात सीतार वादन करीतच आहे आणि तो तिच्या सीताराच्या
धून वर आज ही त्या रहस्यमय जगात नृत्य करीत असतो...अशी ती रहस्यमय सीतार जी अजून सुद्धा राजकुमारी ला तिच्या वास्तव्याच्या दुनियेत जाण्याची परवानगी नव्हती देत...इकडे राजा बापट आणि उर्मिला ह्यांना काही कळेना ..राजकुमारीच्या खोलीत जाण्यास कोणीच तयार होत नव्हते ...कारण तिथे गेलात तर परतीचा मार्ग मात्र कोणास ठाऊक नव्हता...फक्त त्या खोलीत एक रहस्य गूढ होते त्या खोलीच्या आतून रोज संगीताची  धून ऐकायला येई ...आणि असे म्हटले जाते की ती धून ज्या कोणाला एकू येईल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातात...परंतु बापट आणि उर्मिला यांना अजून सुद्धा सर्व रहस्यमय च वाटत होते..विश्वास त्यांचा बसेना...जेव्हा त्यांनी राजकन्येच्या जन्मकुंडली बदल थोडी माहिती काढली तेव्हा समजले की ती राजकन्या नसून रहस्यमय सीतार आहे...जी तिच्या आईच्या आवडीतून आणि कलेच्या छंदातून निर्माण झालेली एक रहस्यमय सीतार आहे...हे ऐकून सर्व राज्य एकदम स्तब्ध होऊन जाते...

©dhanashree sonone रहस्यमय सीतार

#RAMADAAN