Nojoto: Largest Storytelling Platform

°सत्तांतर° सत्तापिपासू कसे खेळती खेळी सामान्यां

°सत्तांतर° 

सत्तापिपासू कसे खेळती खेळी 
सामान्यांचा जातोय रोजच बळी 
सर्व काही अळी मिळी गुप चिळी 
आता तुझी पाळी मीच देतो टाळी 

बंडखोरांच्या बंडाला झाली घाई 
सगळे भरभर सुटले पायी
बाप्यांच्या गोतावळ्यात एकच बाई 
मेंढ्यांच्या कळपात ती गाई अंगाई 

बाराभाईं करणार कारभार 
देवून बुडतीला काडीचा आधार 
इथे रात्र थोडी पण सोंगे फार 
खायला कहार नी भुईला भार  

कार्यकर्ता घालून थकला गाद्या 
एक ना धड भाराभर चिंध्या 
सगळंच दिसल आज ना उद्या 
शेखचिल्ली कसं तोडतंय फांद्या 

ऊसा बरोबर एरंडाला पाणी 
कसायाला गाय होणार धार्जिणी
मनी ना ध्यानी नी तूच माझा धनी 
नकटीच्या लग्नाला सतरा जनी 

कुक्कुलं बाळ झोळीत वाढवलं 
मोठं झाल्यावर डोक्याव बसलं 
सगळं काही जमवून आणलं 
गंगेत एकदाचं घोडं बुडवलं 

कोण सुभेदार नी कोण शिलेदार 
आयजीच्या जीवाव बायजी उदार
जमला सारा उठावळांचा बाजार
उंडगीला मिळाला आयता शेजार 


✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav राजकारण
°सत्तांतर° 

सत्तापिपासू कसे खेळती खेळी 
सामान्यांचा जातोय रोजच बळी 
सर्व काही अळी मिळी गुप चिळी 
आता तुझी पाळी मीच देतो टाळी 

बंडखोरांच्या बंडाला झाली घाई 
सगळे भरभर सुटले पायी
बाप्यांच्या गोतावळ्यात एकच बाई 
मेंढ्यांच्या कळपात ती गाई अंगाई 

बाराभाईं करणार कारभार 
देवून बुडतीला काडीचा आधार 
इथे रात्र थोडी पण सोंगे फार 
खायला कहार नी भुईला भार  

कार्यकर्ता घालून थकला गाद्या 
एक ना धड भाराभर चिंध्या 
सगळंच दिसल आज ना उद्या 
शेखचिल्ली कसं तोडतंय फांद्या 

ऊसा बरोबर एरंडाला पाणी 
कसायाला गाय होणार धार्जिणी
मनी ना ध्यानी नी तूच माझा धनी 
नकटीच्या लग्नाला सतरा जनी 

कुक्कुलं बाळ झोळीत वाढवलं 
मोठं झाल्यावर डोक्याव बसलं 
सगळं काही जमवून आणलं 
गंगेत एकदाचं घोडं बुडवलं 

कोण सुभेदार नी कोण शिलेदार 
आयजीच्या जीवाव बायजी उदार
जमला सारा उठावळांचा बाजार
उंडगीला मिळाला आयता शेजार 


✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav राजकारण