Nojoto: Largest Storytelling Platform

प्राथमिक शाळा.... पर्वा एका साहित्य संमेलनाला गेल

प्राथमिक शाळा....

पर्वा एका साहित्य संमेलनाला गेलो होतो... त्याठिकाणी एक शिक्षक‌ उठुन बोलायला लागले. आणी ते शिक्षक बोलत होते‌ मराठी भाषा बुडतं‌ आहे. कार्यक्रम संपला आणी मी त्यासरांच्या जवळ जाऊन‌ गाठ‌ घेऊन विचारले ,  सर.. बरोबर आहे तुमचे मराठी भाषा बुडतं आहे पण‌ सर बुडण्यामागचे कारण काय. 
सरांच्याकडे कारण देण्यासाठी उत्तर नव्हते. मी सरांना घेऊन जनगनना चालु केली आणी लक्षात आलं‌, जे शिक्षक सांगत होते मराठी बुडतं आहे त्या शिक्षकांची मुलं इंग्लिश मिडीयम ला. मित्रांनो‌ इंग्लिश शिकणे वाईट नाही पण इंग्लिश मिडीयम ला मराठी शिकवले जात नाही हे वाईट आहे.. मराठी भाषा आपली आस्मिता आहे आणी ती सर्वांना आलीच‌ पाहिजे... नाहितर‌ काय होईल,
उद्याचं महाराष्ट्राचं नाव उंच घेऊन जाणारी मराठी मुलं‌‌ तिथच राहतील, आणी समोर येतिल इंग्लिश मुलं. त्यामुळे मराठी भाषा तिथेच राहिली.... मित्रांनो आपल्या बापजाद्यांनी इंग्रजांना घालवण्यासाठी रक्त सांडली त्यांच्या कार्याला काय अर्थ राहतो कसले आपण त्यांचे पाईक महाराष्ट्रीय.....

©Vaibhav Harugade
  सांगा तुम्हीचं....

सांगा तुम्हीचं.... #शिक्षण

1,343 Views