Nojoto: Largest Storytelling Platform

आठवणीचे बंध रेशमी मनात हळव्या दाटुन येती. सान सान

आठवणीचे बंध रेशमी
मनात हळव्या दाटुन येती.

सान सानुले रूप गोजिरे
माथ्यावरती जावळ कुरळे
ओठ गुलाबी इवले इवले
लोभस डोळे लुकलुकणारे

गालावरती तीट लावता
खळी पाडुनी खुदकन हसते
रूप साजिरे बघता बघता
आनंदाने भान हरवते.

पाळण्यातले लोभस रुपडे
जवळी घेता माया झरते
सानकोवळ्या मिठीत इवल्या
सुखस्वप्नांना भरते येते.

बोल बोबडे बोलत बोलत
विश्वच अवघे व्यापून घेते
गुडघ्यावरती रांगत रांगत
नटखट खोड्या वेड लावते.

सौख्यक्षणांचे रंग सोहळे
मनात माझ्या दाटून येती
गेला सरून काळ तरीही
बंध रेशमी मने उजळती

बालपणाचे तरंग गंधित
काळजात मी अलगद जपते
'आई ' म्हणुनी हाक ऐकता
मातृत्वाचे सार्थक होते.

©अर्चना देशपांडे पोळ. बंध रेशमी..
आठवणीचे बंध रेशमी
मनात हळव्या दाटुन येती.

सान सानुले रूप गोजिरे
माथ्यावरती जावळ कुरळे
ओठ गुलाबी इवले इवले
लोभस डोळे लुकलुकणारे

गालावरती तीट लावता
खळी पाडुनी खुदकन हसते
रूप साजिरे बघता बघता
आनंदाने भान हरवते.

पाळण्यातले लोभस रुपडे
जवळी घेता माया झरते
सानकोवळ्या मिठीत इवल्या
सुखस्वप्नांना भरते येते.

बोल बोबडे बोलत बोलत
विश्वच अवघे व्यापून घेते
गुडघ्यावरती रांगत रांगत
नटखट खोड्या वेड लावते.

सौख्यक्षणांचे रंग सोहळे
मनात माझ्या दाटून येती
गेला सरून काळ तरीही
बंध रेशमी मने उजळती

बालपणाचे तरंग गंधित
काळजात मी अलगद जपते
'आई ' म्हणुनी हाक ऐकता
मातृत्वाचे सार्थक होते.

©अर्चना देशपांडे पोळ. बंध रेशमी..

बंध रेशमी.. #Shayari