*चांद पेरला नभात* *भार दाटे नक्षत्रांचा* *कूस बदलते रात* *डोळा श्राप जागण्याचा..* *कळी अबोल खुलेना* *काया सतेज सुकली* *वेडी आसं घोंगावते* *वाटं नजर एकली..* *काय शोधते नजर?* *दूर दूर या वाटंला* *नाही अजून सांगावा* *खिन्न पारवा भेटला..* *शुभ्र चांदणं तळ्यात* *बिंब तुझे उमटले* *क्षण थबकले तिथे* *सर मोती निसटले..* *दारी तोरण आशेचे* *कधीपासून सजले* *ओली हळद माखली* *डोळे पाण्याने भिजले..* *सूर सनई दाटला* *आता झाले मी परकी* *नको बोलं लावू मला* *लाज काकणां सारखी..* ©Shankar Kamble #विरह #भेट #प्रेम #व्याकूळ #जीव #माझं प्रेम #विरही_जीवन… #Rose